Ticker

6/recent/ticker-posts

मांगवाडी येथे पशु चिकित्सा व लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न.



(वाशिम प्रतिनिधी ओंकार पुरी)

रिसोड: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाच्या वतीने, दत्तकग्राम मांगवाडी येथील विशेष संस्कार शिबिरात पशु चिकित्सा व लसीकरण शिबिर यशस्वीरित्या पार पडले. डॉ. ए.जी. वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जयंत मेश्राम होते.

प्रमुख मार्गदर्शिका पशुधन विकास अधिकारी डॉ. जे.पी. केंद्रे व डॉ. मुटकुळे यांनी पशुआरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सुमारे १५० पशूंची तपासणी व लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला पशुधन पर्यवेक्षक श्री. कऱ्हाडे, अजय गिरी, अजय मुंडे तसेच श्रीरामभाऊ वाळके व गजाननभाऊ वाळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. मंगल खेडेकर यांनी संचालन केले, तर वैष्णवी घोडे हिने आभार मानले.