उपनगराध्यक्ष ,स्वीकृत सदस्यासाठी ९ रोजी निवड सभा
कोण होणार अमळनेरचा उपनगराध्यक्ष उत्सुकता शिगेला
अमळनेर : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांनी ९ रोजी दुपारी ३ वाजता सभा बोलावली आहे. नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या ५१ अ -१अ च्या पोटकलम ९ नुसार नगरपरिषद व सदस्य निवडून आल्यानन्तर राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्याच्या २५ दिवसाच्या आत उपनगराध्यक्ष निवड आणि १ ब नुसार नामनिर्देशित सदस्य निवडीसाठी सभा बोलावणे आवश्यक असते. नगराध्यक्ष या सभेचा पिठासन अधिकारी असतो. उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रम पुढील प्रमाणे ९ रोजी सकाळी १२ ते २ नामनिर्देशन देणे व स्वीकारण्याची मुदत, नामनिर्देशन पत्रांची छाननी सभेत १५ मिनिट, अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानन्तर माघार घेण्यासाठी १५ मिनिटे मुदत, त्यांनतर आवश्यक असल्यास निवड घेण्यात येईल, उपनगराध्यक्ष निवड झाल्यावर गट ,आघाडी सदस्य संख्येनुसार नामनिर्देशित सदस्य निवड केले जातील. सुचवलेले सदस्य आवश्यक संख्येच्या जास्त असतील तर अनुक्रमे आधी ज्यांची नावे सूचित केली असतील त्यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडले जाईल.
दरम्यान उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर चार स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यात शिंदे सेना गटाचे दोन ,अपक्ष गटाचा एक आणि तालुका व शहर विकास आघाडीचा एक स्वीकृत सदस्य नामनिर्देशित केले जाणार आहेत. यात देखील कोणाचे नम्बर लागतात यावर अमळनेरकरांच्या नजरा आहेत.





Social Plugin