Ticker

6/recent/ticker-posts

पांगरखेल येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमाचे भूमिपूजन संपन्न



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

पांगरखेल येथे CWAS (CRDF) संस्था व ICICI फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसुरक्षित गाव’ या प्रकल्पाअंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम पांगरखेल ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगरखेल येथे उत्साहात आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी गावातील सर्व नागरिकांना ‘जलसुरक्षित गाव’ या प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आणि शाळेतील विद्यार्थ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व, त्याचे फायदे व पाण्याचे संवर्धन कसे करावे याबाबत CWAS संस्थेच्या प्रतिनिधी कस्तुरी जोशी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला ICICI फाउंडेशनचे प्रतिनिधी जितेंद्र सोरटे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना  उपयुक्त मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी सरपंच ज्ञानेश्वर जगताप यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत पांगरखेल च्या सरपंच सौ. अलका जगताप, उपसरपंच महेंद्र जगताप तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, CWAS संस्थेचे आर्या वाटाणे, हरिश धिवार, गावातील ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या उपक्रमामुळे पांगरखेल गाव जलसुरक्षिततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत असून भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यास निश्चितच मदत होणार आहे.