प्रतिनिधी @समाधान भुतेकर ईसरूळ
19 व्या शतकाच्या अगोदर पासून वसलेल्या भरोसा भाग एक मधील काळोना वाडी चे अस्तित्व देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पार झाली तरी कुठेच दिसत नाही देश एकीकडे महासत्ता होण्याचे मार्गावर असताना अजून महसूल पटलावर स्वतःचे नाव तर नाहीच शिवाय गावांमध्ये गेल्या अनेक दशकापासून अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत त्यामध्ये प्रमुख समस्या म्हणजे आमच्या गावाला येण्या जाण्यासाठी अनेक वर्ष रस्ताच नव्हता काही वर्षांपूर्वी माती भरावाचा गिट्टी टाकून रस्ता जिल्हा परिषद च्या माध्यमातून केल्या गेला परंतु पुन्हा या रस्त्याकडे कोणीही येऊन पाहिले नाही सदर गिट्टी व माती भरावाच्या रस्ता आता निस्तनाबूत झाला सदर रस्त्यावरून साधे पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे कालोना वाडी वरून काळोना पाटीपर्यंत चिखली इसरूळ रोडला जर लागायचे असेल तर त्या अडीच तीन किलोमीटर पर्यंत जीवघेणा प्रवास करावा लागतो रात्री बे रात्री कुणी एखाद्या व्याधीने त्रस्त झाल्यास त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचवणे म्हणजे खूप कष्टाचे होते व अनेकदा दवाखान्यापर्यंत न जाता यम सद नापर्यंत पोहोचल्याच्या सुद्धा घटना घडल्या आहेत.
अशी बिकट अवस्था असताना प्रशासन आमच्याकडे अनेकदा मागणी करूनही लक्ष देत नाही जिल्हा परिषद बांधकाम म्हणते की या रस्त्याचे आम्ही मालक नाही आमच्या अधिकारात येत याशिवाय अनेक समस्या जसे की काळूना वाडीचे नाव नकाशावर नाही तसेच पाटबंधारे विभागाने आजूबाजूच्या सर्व गावांना पाठाची व्यवस्था केली पोच पाणी दिले परंतु काळोणा वाडी च्या ग्रामस्थ शेतकऱ्यांना मात्र त्या पाण्यापासून सुद्धा पाटबंधारे विभागाने वंचित ठेवले आम्ही आमचे अस्तित्व महसूलच्या नकाशावर नाही तर आम्ही या देशाच्या नकाशावरूनच काढण्याचा व येणाऱ्या काळात सर्व सुविधा पासून दूर ठेवण्याचा एकूणच प्रयत्न प्रशासनाकडून चालू आहे का आम्ही आता या हात जोडून विनंती करून अनेक ठिकाणी चकरा मारून थकलो असून आता आमच्या सर्व समस्या मार्गी लागल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मुद्दा नंबर एक आमचा कळना पाटी ते कळून वाडी रस्ता आमचे काम डांबरीकरणासह करून देण्यात यावे. पाटबंधारे विभागाने आम्हाला फाटा पासून वंचित ठेवले त्या पाटबंधारे विभागाने आम्हाला पाटाचे व्यवस्था करून देऊन खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी आमच्या शेतीला द्यावे आमच्या गावाला विशेष म्हणजे स्मशानभूमी सुद्धा नाही तिची व्यवस्था करून देण्यात यावी व विशेष म्हणजे आमच्या गावाचे नावाच स्वतंत्र अस्तित्व अर्थात आमच्याकडून काळोना वाडीचे नाव महसूल पटलावर घेण्यात यावे.
या सर्व समस्या आपण तातडीने सोडवण्यात याव्या आपण आमच्या मागण्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आम्हाला न्याय न दिल्यास आम्ही येणाऱ्या वीस दिवसानंतर अर्थात येणाऱ्या 9 फेब्रुवारी 2026 रोजी चिखली इसरूळ रोडवरील काळेना पाटीजवळ सर्व ग्रामस्थ महिला मंडळी सह आमरण उपोषणास बसणार. शिवाय येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या मतदानावर आमचा स्पष्टपणे बहिष्कार असेल आम्ही कुठेही मतदानाला जाणार नाही अशा आशयाचे निवेदन पदाधिकारी तथा काळुना ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले सदर निवेदन देतेवेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, माझी शिवसेना तालुकाप्रमुख अर्जुन भाऊ नेमाडे, अनिल सिंग चव्हाण, समाधान उसर गणेश उसर गजानन उसर मधुकर उसर बबन उसर रंगनाथ शिंदे शिवाजी गाडेकर श्रीराम शिंदे रमेश उसर अशोक उसर सुखदेव गाडेकर नारायण उसर संजय उसर दत्ता उसर यासह अनेक मंडळींच्या सह्यांसह उपस्थितीत निवेदन देण्यात आले





Social Plugin