Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड - उमरेड येथे जनता दरबार चे आयोजन.

 




भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी

उमरेड येथे माजी आमदार राजु पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनांक .२१.०१.२०२६ ला भव्य जनता दरबार चे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या. काही तातडीच्या समस्या स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तत्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, तर अनेक नागरिकांची निवेदनं स्विकारून त्या बाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. लोकांच्या विश्वासास पात्र राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी ते नेहमीच सदैव कटिबद्ध राहतील असे स्थानिक माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

या जनता दरबार ला स्थानिक नागरिक तसेच ग्रामीण भागातील लोकांनी सहभाग घेतला असून त्याची मागन्या लवकर निकाली लागतील असा विश्वास नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.