Ticker

6/recent/ticker-posts

माळकिणीच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे






कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी

मंठा :  माळकिणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोमवार, दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच जगदीश जाधव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक जाधव, उपाध्यक्ष रामेश्वर इंगळे व पोलीस पाटील विष्णू गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पालकवर्ग तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे शाळेच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक भगवान जायभाये यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आयोजनाचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले.

यानंतर प्रमुख मान्यवरांच्या मनोगतांनंतर चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. शाळेतील बाल कलाकारांनी नृत्य, गीत व नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

या कार्यक्रमास माळकिणीतील प्रतिष्ठित नागरिकांसह तरुणाईने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास सुदेवाड व संदीप धामणे यांनी विशेष परिश्रम घेतले.