Ticker

6/recent/ticker-posts

भोकरदन येथील बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटी च्या शाखेत तारण असलेले सोने सोडवुन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

 


भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील ।

 बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी हि संस्था बंद पडणार आहे अशी खोटी अफवा पसरली त्यामुळे दोन दिवसापासून येथील शाखेत तारण असलेले सोने व ठेवी काढून घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून दोन दिवसांमध्ये दोन कोटी तीस लाख रुपये भरून लोकांनी आपले सोने परत नेले आहे त्यामुळे शाखेत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे, एकाच वेळी पैसे भरून तारण असलेले सोने परत घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे, काही नागरिकांनी या शाखेत सोने तारण ठेऊन पैसे घेतले आहे, सध्या सोन्याचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे बीड जिल्ह्यात कोणी तरी सदर पतसंस्था लवकरच बंद पडणार आहे अशी चर्चा केली त्यामुळे बीड जिल्ह्यातील शाखेतील सोने व ठेवी नागरिकांनी काढून घेण्यास सुरुवात केली त्याचे लोण दोन दिवसापासून भोकरदन येथे पसरले आहे, त्यामुळे नागरिकांनी सोने व ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी केली आहे, मात्र शाखेत एकाच वेळी गर्दी झाल्याने कर्मचारी अडचणीत आले आहे, प्रत्येकाला अगोदर माझे द्या, त्यांचे नंतर द्या अशी मागणी करीत नागरिकांनी बँकेत रेटारेटी सुरू आहे, त्यामुळे अधिकारी व कर्मचारी हतबल झाल्याचे दिसून आले आहे.

दिलीप ताठे:- या शाखेचे शाखाधिकारी दिलीप ताठे यांनी सांगितले की आमच्या बँकेची परिस्थिती अत्यंत चांगली आहे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिले आहेत की बँकेमध्ये आपले डिपॉझिट असलेले पैसे अथवा तारण असलेले सोने नेण्यासाठी कोणताही ग्राहक आल्यास त्याला परत न पाठविता पैसे अथवा सोने देऊनच परत पाठवावे मात्र कोणी तरी खोटी अफवा केली आहे, खातेदारानी त्यावर विश्वास ठेवू नये असे सांगितले, शिवाय त्यांनी सांगितले की आमच्या शाखेत तब्बल 15 कोटी रुपयांचे सोने तारण कर्ज वाटप केले आहे तसेच राखी मध्ये तीस कोटी रुपये डिपॉझिट आहेत अकरा हजार पाचशे आमचे खातेदार आहे, सदर सोने हे भोकरदन येथील शाखेतच आहे, त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, 1 जानेवारी 1 कोठी 25 लाख रुपयांचा भरणा करून सोने परत नेले आहे, तर दोन जानेवारी रोजी दोन कोटी20 लाख रुपये भरून ग्राहकांनी सोने परत नेले आहे एकाच वेळी मोठी गर्दी झालेली आहे, त्यामुळे कर्मचारी यांच्यावर ताण आला आहे, असेही ताठे यांनी सांगितले.

अनेक बँका, पतसंस्था बंद झाल्याने नागरिक घाबरले:- भोकरदन तालुक्यातील अनेक नागरिकांचे ज्ञानराधा पतसंस्था, रायसोनी पतसंस्था, मलकापूर अर्बन बँक अशा अनेक लहान मोठ्या पतसंस्था मध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवी गुंतलेल्या आहेत व सदर बँका, पतसंस्था बंद पकडल्या आहेत, व त्यामध्ये पैसे अडकून पडले आहे, त्यामुळे नागरिकांनी बुलडाणा अर्बन पतसंस्थेत सोने व ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी केली आहे.