ACF दबंग महिला कर्मचारी १५ हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक.अश्विनी आपेट हिच्याबद्दल वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. तरीदेखील तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची सूत्रांची माहीती.
सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा : बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयात दि 31 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत. वनविभागाच्या ACF (सहाय्यक वन सरंक्षक )अश्विनी आपेट आणि लिपिक कर्मचारी अमोल मोरे यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कापलेले लाकूड वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या रकमे पैकी पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये स्वीकारताना ACB पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. ही कारवाई बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयातच करण्यात आली. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ACB ने सापळा रचून ही कारवाई केली असल्याची माहिती आहे.
अटकेनंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून, ACB कडून पुढील तपासानंतर अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
.jpg)




Social Plugin