Ticker

6/recent/ticker-posts

मार्डी जि.प मध्ये घड्याळाचे काटे फिरणार की कमळ उमलणार ?

 



( जोतिराम काटकर जिल्हा प्रतिनिधी )

   मार्डी जिल्हा परिषद गट हा माण तालुक्याचे किंगमेकर स्व.सदाशिवराव पोळ तात्या यांचा बालेकिल्ला मानला जातो .  परंतु याच  मार्डी जि.प मध्ये तात्यांचे थोरले चिरंजीव डॉ. संदीप पोळ यांनी दीड वर्षे पुर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विचाराने प्रभावित होउन भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला . तर तात्यांचे धाकटे चिरंजीव मनोज पोळ हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये राहुनच तात्यांचा वारसा चालवत आहेत.

     परंतु तात्यांचा दोन्ही सुना या जिल्हा परिषद साठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून सोनालीताई पोळ , तर भाजप कडून डॉ. भारतीताई पोळ यांना तिकीट मिळाले आहे. यामुळे मार्डी जिल्हा परिषदेवर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे. 

     ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेली विकासकामे , पाणी , रस्ते विकास यामुळे माण मध्ये भाजप पक्ष वाढत आहे. म्हणून सध्यातरी मार्डी जिल्हा परिषद गटामध्ये घड्याळाचे काटे फिरणार की माळरानावर कमळ उमलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.