घनसावंगी | प्रतिनिधी : कैलास कोल्हे |
घनसावंगी: तालुक्यातील गुरुपिंपरी येथील अजय (उर्फ शरद) पुंजाराम घेरे यांचा सुमारे १० ते १२ दिवसांपूर्वी तलवाडजवळ गंभीर अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून सध्या ते कोमामध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.
अजय घेरे यांच्यावर तातडीचे ऑपरेशन व पुढील उपचार सुरू असून आतापर्यंत सुमारे १० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. पुढील उपचारांसाठीही मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च अपेक्षित आहे. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने हा खर्च उचलणे कुटुंबीयांना शक्य होत नाहीये.
या पार्श्वभूमीवर अजय घेरे यांच्या उपचारासाठी सर्व सहृदय नागरिकांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे. “फुल ना फुलाची पाकळी” या भावनेतून दिलेली छोटीशी मदतही एका कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते व एका तरुणाचे प्राण वाचवू शकते, असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत जास्तीत जास्त नागरिकांनी या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
.jpg)




Social Plugin