लक्की राठोड मांडवी
मांडवी येथील लुल्यादादा मैदानावर सध्या क्रिकेटच्या भव्य खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या आगमनाने खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.यावेळी डी वाय एसपी साहेबांनी मैदानात जाऊन खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. "खेळामुळे सांघिक भावना आणि शिस्त निर्माण होते. तरुणांनी मैदानी खेळांकडे वळून आपले आरोग्य सुदृढ ठेवावे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, आयोजकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सामना आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.मांडवीतील या क्रिकेट स्पर्धेत परिसरातील अनेक संघ सहभागी झाले असून, प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या या भेटीमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.





Social Plugin