Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव खंडेश्वर येथे मा. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली कार्यक्रम



गौरव ब्राम्हणवाडे (@ ग्रामीण प्रतिनिधी)

नांदगाव खंडेश्वर  दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा श्रद्धांजली कार्यक्रम आज दुपारी ठीक 5.00 वाजता बस स्टॉप परिसर, न्यू लाईफ हॉस्पिटल समोर, यवतमाळ रोड, नांदगाव खंडेश्वर येथे पार पडला. या कार्यक्रमास सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मा. अजित दादा पवार यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

उपस्थित पदाधिकारी - डॉ भूषण पोतदार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अविनाश ब्राम्हणवाडे, राहुल उडबगले,अमोल सुने,बबन सोनोने संदीप अंबुरे,भारतीय जनता पार्टी चे संजयजी पोपळे, सतीश पटेल,योगेश चवाळे,योगेश खंडार,गजानन डोक, काँग्रेस पक्षांचे अमोल ढवसे, NCP SP पक्षांचे अमोल शिरभाते, शिवसेना शिंदे गटा चे विवेक भगत, उ बा ठा पक्षाचे प्रशांत काळे,cpim काँब्रेट पक्षाचे, किशोर शिंदे, व तसेच अक्षय वाघमारे, दीपक ब्राम्हणवाडे, विक्की भगत, बाबाराव देशमुख, धंनजय भडके,महाराष्ट्र ग्रामीण न्यूज प्रतिनिधी गौरव ब्राम्हणवाडे उपस्थित होते.