Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच इनामदार रहेरबर यांच्या हस्ते ध्वजारोहन व शाळेत बक्षीस वाटप.



आमेटवार राजेश ग्रामीण : प्रतिनिधी बिलोली

बिलोली : तालुक्यातील मौजे हिप्परगा थडी येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात पार पडला असून हिप्परगा येथील युवा सरपंच रहेरबर इमानदार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला असून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावातील युवा वर्ग, प्रतिष्ठीत नागरिक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये शाळेतील चिमुकले मोठया आनंदाने प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि तसेच महापुरुषांच्या वैयक्तिक जीवनावर भाषणे केले.आणि महामानवा विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी हिप्परगा थडी येथील डॉ.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका चे ग्रंथपाल अंजनिकर राजू व पत्रकार मारोती एडकेवार यांच्या पुढाकारातून व वाचनालयातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आले होते.

त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वाचनालयामार्फत प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील सरपंच रहेरबर इनामदार, मा. सरपंच तसेच भाजपा झोपडपट्टी जिल्हा संयोजक साहेबराव अंजनिकर, मा. सरपंच प्र.मिया पटेल, पोलीस पाटील शंकर प्पा मठपती,उपसरपंच चंद्राबाई व्यंकट तुकडे,मठपती अशोक, अबजल मोमीन,सय्यद गौस,ग्रा. पंचायत सदस्य तुकडे राजू, गौस शेख,सय्यद एजास, इरफान सय्यद,समाज अध्यक्ष भगवान एडकेवार,एडकेवार जक्कोजी, मा.चेअरमन अहमदसाब,शालेय समितीचे अध्यक्ष सय्यद नय्युम,उपाध्यक्ष मुजाहिद सय्यद,तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव मामडे शाळेतील शिक्षकवृंद आणि सर्व ग्रामपंचायत आजी आणि माजी सदस्य व गावातील सर्व सामाजिक, तसेच गावातील सर्व पक्षातील कार्यकर्ते आणि युवा संविधान प्रेमी, शिक्षण प्रेमी,शाळेत सत्कार असणाऱ्या मुलांचे पालक देखील आपली उपस्थिती दाखवून आपल्या मुलांचे गौरव पाहत होते.आणि जेंव्हापासून अण्णाभाऊ साठे अभ्यासिका चालू झाली तेंव्हापासून लेकरांच्या अभ्यासात खूप चांगली प्रगती दिसत आहे असे आपापसात कुजबुज करत होते. आणि आमच्या मुलांचे उज्वल भविष्य घडेल असे आशा बाळगत मोठया उत्सहाने हा प्रजासत्ताक आणि बक्षीस वाटपाला उपस्थित होते.