●मुखेड:मुखेड शहरातून काही अंतरावर खैरका रोडवर डोंगर माळावर स्थित सुप्रसिद्ध सुफी संत हजरत सय्यद साबेरअली शाह खादरी (र.अ.)यांचा दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही देखील उर्स संदल शरीफ कार्यक्रमास उत्साहात भव्यदिव्य संपन्न झाले.
सदरील उर्स शरीफ संदलची सुरूवात देगलूर नगरीतून थेट मुखेड दर्गाह नगरीत दि.२९ डिसेंबर रोजी सोमवारी विधिवत करण्यात आली. संध्याकाळी 'जलसा-ए-औलिया' या कार्यक्रमासह, मंगळवार दि.३० डिसेंबर रोजी चरागाँ,बाद इशानंतर सुप्रसिद्ध कव्वाल गायक मोहम्मद सलीम अरमान इफ्तेखारी यांच्या बहारदार गायनाने कव्वालीचा कार्यक्रम संपन्न झाला.दि.३१ डिसेंबर रोजी बुधवारी फजर नमाजानंतर फातेहा ख्वाॅनी, कुरान ख्वानी, फातेहा,सलातो सलाम व प्रासादाचे वाटप करीत तीन दिवसीय उरूसाची सांगता करण्यात आली. कर्नाटक, तेलंगाणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आदि राज्यातील अनुयायी, भाविकांची उल्लेखनीय उरूसात उपस्थिती होती.
या प्रसंगी मुखेड-कंधारचे विद्यमान आमदार मा.डाॅ.तुषार राठोड, मुखेडचे माजी नगराध्यक्ष मा.गंगाधर राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख व्यंकटराव पाटील खतगांवकर,
नगरसेवक मा.नासेर खाँ पठाण,खैरका ग्राम माजी सरपंच,मा.लक्ष्मण पाटील,रामराव महाराज,दर्गाह मुतवल्ली हजरत सय्यद सलीम पाशा खादरी,इस्माईल पाशा खादरी,यनभुरा,हाफिज जमीर अलीशाह खादरी, हजरत हाफिज व खारी मोहम्मद जमालोद्दीन खादरी, नासरीन दर्गाह,उरूस समिती विद्यमान अध्यक्ष काझी सय्यद साबीर हुसेन खादरी,उपाध्यक्ष अनवर खान पठाण, सय्यद सुबहानी खादरी,हज़रत इक्बाल अलीशाह खादरी, महाराष्ट्र ग्रामीण बँक सहाय्यक महमदरफी मदार आदमपूर,शेख आमीर कंधारी,शेख बाबामियाँ लाटवाले, सय्यद शमशोद्दीन,पठाण रूस्तूम खान,शेख मौला,अहेमद खान,मुन्ना पेंटर,शेख अहेमद,शेख ताजोद्दिन शेख इब्राहिम, शेख आमेर,मुखेडसह जिल्हाभरातील राजकीय आजी, माजी पदाधिकारी,शहरातील प्रतिष्ठित नागरिक,विविध भागातील (मुरीद)अनुयायी,माध्यम प्रतिनिधी आदिंची उपस्थिती असणार आहे.





Social Plugin