Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिर दे मही येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाला



प्रतिनिधी @समाधान भुतेकर ईसरूळ

स्थानिक सहकार विद्या मंदिर दे मही येथे आज दि 1 जानेवारी पासून संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्याम चांडक (भाईजी) डॉ सुकेशजी झंवर व कोमल झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात सुरुवात झाली .या क्रीडा स्पर्धा सलग तीन दिवस असणार आहेत..*स्फूर्ती*वार्षिक क्रीडा महोत्सव 2025-26 या नावाने या स्पर्धा असणार आहेत..

आजच्या क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याला विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते ..त्यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सौ गोडे मॅडम तर प्रमुख मान्यवरमध्ये डॉ सौ शिल्पा ताई दंडाले मॅडम,सौ जोस्सना शिंगणे श्री रिकबचंदजी कोटेचा, श्री वाणी सर,देशमाने सर व मुख्याध्यापक प्रकाश इंगळे सर इ मान्यवर उपस्थित होते..कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांची लेझीम व ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापक प्रकाश इंगळे सरानी करून कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला .तसेच गोडे मॅडम यांनी विध्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगितले आणि वाणी सर यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकासासाठी खेळ किती महत्वाचे आहे ते स्पष्ट केले. सदर क्रीडा महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला..मान्यवरांच्या स्वागतासाठी लेझीम,मल्लखांब चे चित्तथरारक कवायती विध्यार्थ्यांनी सादर केल्या..सदर क्रीडा महोत्सवासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केशव तळेकर सर यांनी केले.