Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर - नांदेड आंतरराज्य महामार्गावरील आदमपूर फाट्यावर गतिरोधक बसवुन दैनंदिन होणारे अपघात टाळावे; प्रवाशासह वाहनधारकातून मागणी.



देगलूर- प्रतिनिधी

 बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा येथून जाणाऱ्या नांदेड हैदराबाद अंतरराज्य महामार्गावर वाहनाचे नेहमीच वर्दळ असते. तसेच या ठिकाणाहून आदमपूर परिसरातील अनेक नागरिक प्रवास करीत असल्याने व या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने देगलूर कडून नांदेडकडे व नांदेडकडून देगलुर कडे जाणारे वाहने हे भरधाव वेगाने जात असल्याने रस्ता ओलंडताना व आदमपुरहून नांदेड व देगलूरकडे जाणाऱ्या वाहनांचे दैनंदिन छोटे मोठे अपघात घडून या ठिकाणी जिवीत हानी होत असल्याने या ठिकाणी शासनाने तात्काळ गतिरोधक बसवुन भविष्यात होणारे छोटे-मोठे अपघात रोखण्यात यावे अशी वाहनधारकासहित प्रवाशातुन मागणी होत आहे.

आदमपूर फाटा या ठिकाणी नेहमीच प्रवाशाची व वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणाहून आदमपूर परिसरातील आदमपूरसह खतगाव , थडीसावळी, गळेगाव, मुतण्याळ कोटेकलुर, रामपूर, केसराळी आदी गावचे हजारो नागरिक हे स्वतःच्या वाहनाने व इतर वाहनाने या ठिकाणावरून देगलूर, नायगाव या बाजारपेठेसह जिल्हा ठिकाणी नांदेडला काही कामानिमित्त जात असतात. 

 आदमपूरकडून येणारे सर्व नागरिकांना नांदेड शंकरनगर, नायगाव कडे जाण्यासाठी येथून जाणारा देगलूर नांदेड राज्य महामार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला जावावे लागत असल्याने या रस्त्यावरील देगलूरकडील बाजूला व नांदेड कडील बाजूला गतिरोधक नसल्याने दोन्ही साईडचे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनास तात्काळ ब्रेक लागणे शक्य नसल्याने याठिकाणी दैनंदिन छोटे-मोठे अपघात घडत आहेत. केवळ या ठिकाणी गतिरोधक नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडून या ठिकाणी आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन या ठिकाणी तात्काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतिरोधक बसवून येथील होणारे अपघात टाळावे असे नागरिकांतून मागणी होत आहे. परंतु या मागणीला राष्ट्रीय महामार्ग नांदेड जिल्हा अंतर्गत काम करणारे शासकीय अभियंता, उपअभियंता व अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी आज पर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आसल्याने वाहनधारकासह प्रवाशातून संबंधित अधिकाऱ्या विरोधात रोष व्यक्त होत आहे. *नांदेड ते देगलूर मार्गे हैदराबाद जाणारा या आंतरराज्य महामार्गावर बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा येथील डांबरीकरण रस्त्यावर गतिरोधक नसल्याने व रस्त्यावर वाहना सहित प्रवाशांची वर्दळ असल्याने या ठिकाणी अपघात घडून जीवित हानी होत आहे. त्यामुळे शासनाने या ठिकाणी आदमपूर कडून येणाऱ्या रस्त्यावर देगलूर कडे व नांदेडकडील बाजूस गतिरोधक बनवून या ठिकाणी होणारी जिवीत हानी थांबवावी. बाळासाहेब चट्टे, माजी उपसरपंच प्रतिनिधी आळंदी*