Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावात रवींद्रकुमार पवार शिक्षण दीप पुरस्काराने सन्मानित



अपेक्षा न करता केलेले कार्य उल्लेखनीय - उदय शिंदे

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

गुणवंतांचे शिल्पकार शिक्षण दीप पुरस्कार २०२६आदर्श शिक्षक कै. दीपक जाधव गुरुजी यांचे स्मरणार्थ पदवीधर शिक्षक श्री रवींद्रकुमार शंकरराव पवार यांना आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये प्रदीर्घ शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच पुसेगाव येथील श्री रामचंद्र जाधव सर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने शिक्षण समितीचे जेष्ठ कार्यकर्ते व मा. राज्याध्यक्ष उदय शिंदे यांचे हस्ते देण्यात आला.

पुसेगाव ता. खटाव येथे आदर्श शिक्षक कै.दीपक जाधव गुरुजी यांचे स्मरणार्थ द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त यांच्या पत्नी श्रीमती सीमा जाधव, तसेच चिरंजीव प्रशांत व सुशांत व भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य सरचिटणीस लेखक रामचंद्र जाधव, भानुदास जाधव, श्रीमती कौशल्य जाधव व सारिका जाधव यांचे उपस्थितीमध्ये देण्यात आला. यावेळी बोलताना उदय शिंदे म्हणाले,"रवींद्र कुमार पवार यांचे शैक्षणिक जीवनातील कार्य अभेद्य व प्रदीर्घ असे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी गेले, त्यांनी तन मन झोकुण शैक्षणिक सेवा केली. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता केलेले कार्य हे उल्लेखनीय असून ते निश्चित फळ देऊनच जाते. त्याची प्रचिती आज या ठिकाणी श्री रवींद्रकुमार पवार यांना मिळालेल्या पुरस्काराने दिसून आली असल्याचे मत उदय शिंदे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्राथमिक शिक्षण समिती जिल्हाध्यक्ष रणवरे, प्राथमिक शिक्षक समिती सहकारी बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव, किरण जाधव, प्राथमिक शिक्षक समिती तालुकाध्यक्ष आबा जाधव, माजी केंद्रप्रमुख एस के जाधव, बँड बँजो चालक-मालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक जाधव, सातारा जिल्हा भटक्या विमुक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, विलास माने, मोहन माने, येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील, विठ्ठल फडतरे, पुसेगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रकाश जाधव पुसेगाव पंचक्रोशीतील विविध मान्यवर, कुटुंबीय उपस्थित होते.