*येरगी येथे वसंत पंचमी उत्साहात साजरी@*
देगलूर : प्रतिनिधी
संपूर्ण तालुक्यात फक्त येरगी येथे चालुक्य कालीन सरस्वतीचे मंदिर असून सर्व विद्यार्थ्यांना विद्येची देवता सरस्वती मातेला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करून विद्यार्जन करावे असे आवाहन सरपंच संतोष पाटील यांनी येरगी येथे वसंत पंचमी निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
देगलूर तालुक्यातील येरगी येथे चालुक्य कालीन सरस्वतीचे एकमेवाद्वितिय मंदिर असून ,काल शुक्रवारी वसंत पंचमी(सरस्वती जन्मोत्सव) च्या दिवशी शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांनी येथील सरस्वती मंदिरात जाऊन वस्त्र अर्पण करून विधिवत पूजा अर्चना केली.
गावचे सरपंच संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील वसंत पंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी सरस्वती मंदिराच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर सरस्वती मातेचे दर्शन घेतले तत्पूर्वी सर्व उपस्थितांनी सरस्वती या मूर्तीचे पूजन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी सरस्वतीचे स्तवन केल. शाळेतील निरागस विद्यार्थ्यांनी चांगली बुद्धिमत्ता प्राप्त होण्यासाठी बुद्धीची देवता सरस्वती मातेची प्रार्थना केली.
यावेळी सरपंच संतोष पाटील यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना भेट स्वरुपात वही व पेन देण्यात आले,यामुळे सर्व विद्यार्थी आनंदित झाले होते. यावेळी गावातील महिला - पुरुष नागरिक, लहान थोर मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी विद्यमवार यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नागोराव चव्हाण,सह शिक्षिका वैशाली सागावे,बालिका पंचायत राज समितीच्या सचिव महादेवी दाणेवार,अंगनवाडी चे गंगामणी दारलावार, हाणमाबाई बरसमवार, मजुळा सिलमकुटवार, नागमणी बरसमवार, प्रणिता बरसमवार,बचतगटचे पिआरसी मयना वाघमारे आदी उपस्थित होते.





Social Plugin