Ticker

6/recent/ticker-posts

हिंदी भाषा रोजगार निर्मितीचे व संवादाचे प्रभावी माध्यम आहे....प्रा.डॉ.दिलीपकुमार कसबे.



छायाचित्र - पुसेगाव -विश्व हिंदी दिवस एक दिवशीय कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.दिलीपकुमार कसबे, व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले,प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर, प्रा.एल.के.पवार, प्रा. श्रीमती मुल्ला आर. के.  -. छाया_ प्रकाश राजेघाटगे


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] |

 हिदी भाषेमुळे देश विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन प्रा.डॉ .दिलीपकुमार कसबे यांनी पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात  हिंदी विभाग आणि लीड कॉलेज अंतर्गत 'विश्व हिंदी दिवस 'कार्यक्रम एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, लीड कॉलेज विभागाचे चेअरमन प्रा एल.के.पवार,प्रा.श्रीमती मुल्ला आर. के.इ.उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणात डॉ.कसबे म्हणाले,' हिंदी भाषा ही सर्वश्रेष्ठ असून ती देशाला एकत्र बांधणारी भाषा असल्याचे मत व्यक्त केले.मातृभाषेवर प्रेम करणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. 

हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून लेखन,पत्रकारिता,अनुवाद, प्रसारमाध्यमे आदी क्षेत्रांत उज्ज्वल करिअर घडवता येते,असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची महत्व समजावून सांगितले.प्रादेशिक भाषांसोबतच हिंदीचे सखोल ज्ञान आवश्यक असून ते संशोधन,स्पर्धा परीक्षा,कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरते,असे त्यांनी नमूद केले. आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भाषा ज्ञान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दल आवड व जागृती निर्माण झाली.कार्यक्रम प्रसंगी कु. रेणुका घनवट कु.गौरी माने या विद्यार्थिनींनी आपलं मनोगत व्यक्त केल कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती मुल्ला आर.के.यांनी केला. सूत्रसंचालन कु.ज्ञानेश्वरी बोराटे हिने केले.तर आभार कु.रिया पवार हिने मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी,विद्यार्थिनी ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.