Ticker

6/recent/ticker-posts

धर्मवीर संभाजी विद्यालय देगाव मध्ये कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा .

     

  हिंदुस्तान के रंग: विविधतेतून एकतेचा सांस्कृतिक उत्सव


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

भारतीय संस्कृतीतील विविध रंग,परंपरा आणि लोककलेचे दर्शन घडवणारा“हिंदुस्तान के रंग”हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम मा.सौ वैशालीताई साळुंखे सरपंच देगाव यांच्या अध्यक्षते खाली शनिवार दि .१७ जानेवारी  रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.सांस्कृतिक  कार्यक्रमांतर्गत देशाच्या विविध राज्यांतील नृत्य, संगीत व लोककला सादर करण्यात आल्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.प्रविणकुमार घाटगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . तसेच कोळी नृत्य,जोगवा, लावणी विविध राज्यांचे नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.तसेच ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा नाटक दर्जेदार पद्धतीने विद्यार्थ्यांनी सादर केले व उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविधतेत एकता हा भारताचा संदेश प्रभावीपणे सादर केला.कार्यक्रमाचे औचित्य साधून स्कूल कमिटीचे सदस्य मा.राजेंद्रजी घाडगे साहेब यांनी या वर्षी पासून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचे नियोजन केले होते.विद्यालयाचे प्राचार्य मा.प्रविणकुमार घाटगे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच राजेंद्र घाडगे यांचा सेवानिवृत्ती निमित्त विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.राज्य पातळीवर यश मिळविलेले विद्यार्थी/खेळाडू यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे विभागीय अधिकारी मा.श्री.नवनाथजी जगदाळे साहेब उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक केले.यावेळी शेतकरी हायस्कूल तारगाव शाखेचे मुख्याध्यापक श्री. किरण देवकर सर उपस्थित होते .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूल कमिटी सदस्य मा.श्री.राजेंद्रजी घाडगे साहेब यांनी सर्वतोपरी सहकार्य केले,कार्यक्रमासाठी श्री.राजेंद्रजी साळुंखे,श्री. जालिंदर साळुंखे,श्री.विश्वास साळुंखे,श्री.नितीन साळुंखे तसेच सहाय्यक पोलिस निरिक्षक सातारा मा.काटकर साहेब माजी वियार्थी संघाचे अध्यक्ष श्री.खंडेराव घाडगे, देगाव ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, देगाव मधील सर्व मंडळे,माजी सैनिक संघ, सर्व माजी विद्यार्थी,देगाव विकास सोसायटी,पंचक्रोशीतील सर्व पालक,नागरिक,ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित होते.आयोजकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन सौ. मोरे एस.एस व सौ.पाटील जे. पी.यांनी केले.सूत्रसंचालन सौ.कुंभार जे.डी.व श्रीमती.मोरे.ए.एस.यांनी केले.विदयालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होणेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमास देगाव ग्रामस्थ यांनी खूप आर्थिक मदत सहकार्य केली.कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख श्री.खरात ए.जी.यांनी मानले.