पाटण (दिनकर वाईकर) -
पाटण तालुक्यातील येराड येथील भक्तांच्या हाकेला धावणारा व भक्तांच्या नवसाला पावणारा श्री क्षेत्र येडोबा देवाची वाळवंटी यात्रा सोमवार 19 जानेवारी रोजी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थित मोंठ्या उत्सवात मंगळवारी पहाटे संपन्न झाली श्री क्षेत्र येडोबा देवाच्या वाळवंटी यात्रेस महाराष्ट्र कर्नाटक कोकण व परिसरातील भाविक भक्त महिला वर्ग सह तरूण वर्ग ही मोंठ्या संख्येने उपस्थित होते श्री क्षेत्र येडोबा देवाची वाळवंटी यात्रा मोठ्या उत्साहात पारंपरीक पध्दतीने पार पडली
पाटणपासून अवघ्या ५ किलोमिटर अंतरावर असणा-या कराड चिपळूण मार्गावरील येराड ता. पाटण येथे श्री क्षेत्र येडोबा देवाचे भंव्य मंदिर आहे हे कोयना नदिच्या तिरावर व झाडी झुडपाचें मंध्ये वनराईत वसलेले आहे सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र येडोबा देव हे पौष पौर्णिमा दिवशी जंगलामध्ये शिकारीला गेले व पंधराव्या दिवशी म्हणजेच पौष अमावस्येला रात्री साडेनऊ ते दहा वाजता सुमारास येराड येथील असणा-या सवरीच्या झाडाजवळ सायंकाळी विसाव्याला येतात त्यादिवशी रात्री श्री येडोबा देवाची वाळवंटी यात्रा दरवर्षी प्रमाणे साजरी करण््यात भरते त्यादिवशी रात्री श्री येडोबा मंदिराच्या देवळातून देवाचे मानकरी येडोबा देवाची सासनकाठी वर येडोबा देवाची देखणी मूर्ती सासनकाठीवर चांदीच्या घोड्यावर स्वार होऊन बसलेली देवाची मूर्ती सजवून मंदिराला प्रदक्षिणा घालून राज्यातून व परिसरातून मोंठ्या प्रमाणात आलेल्या भाविक भक्ताच्या समवेत येडोबा देवाच्या नावान चांगभलं व ठोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत देवाची सजवलेली पालखी येडोबा देवाच्या रसत्यांनी भाविक भक्तासह सवरीच्या झाडाजवळ रात्रौ दहाच्या सुमारास आली यावेळी येराड गावातील सासरवासिन मोंठ्या संख्येने आपल्या कुटुंबियांसह दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उपस्थित होत्या यावेळी येडोबा देव सवरीच्या झाडाजवळ विसाव्याला थांबले होते त्या ठिकाणी
येडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती यावेळी येडोबा देवाच्या वाळवंटी यात्रेचे स्वरूप दिसुन आले भाविक दर्शनासाठी रांगेतून दर्शन घेत होते महिला वर्गासह पुरूषमंडळी व तरुण -तरुणानी येडोबा देवाचे मोठ्या भक्तिभावाने दश्रण घेतले यात्रेत खेळणी मेवामिठाई सह गुलाल खोबरे तेल व खाद्यपदार्थांचे अनेक प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते देवाच्या पालखी समोर पहाटे पाच वाजेपर्यंत श्री येडोबा देवाच्ची गाणी व ओव्या गोंधळाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी भाविक भक्त सकाळी पहाटेपर्यंत देवाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यंत चालू होता नंतर श्री येडोबा देवाची चांदीच्या घोड्यावरील सजवलेली पालखी सोमवारी रात्री वाजत गाजत आलेल्या येडोबा देवाच्या रस्त्याने येडोबा मंदिराकडे मंगळवारी पहाटे भाविकासह मार्गस्थ झाली त्यावेळी मानकरी भाविक भक्तगन व ग्रामस्थ मोंठ्या संख्येने होते





Social Plugin