देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के
दिनांक 2 जानेवारी 2026 ते दिनांक 8 जानेवारी 2026 या दिवशी विजयदुर्ग पोलीस ठाणे यांच्या वतीने पडेल कॅन्टींग साई गणेश मंगल कार्यालय या हॉलमध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक विजयदुर्ग पोलीस ठाणे माननीय श्री संजय कातीवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. या कार्यक्रमाला विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चव्हाण हे मान्यवरांचा परिचय देत होते. त्याचप्रमाणे कॉन्स्टेबल जयेश सुरेश कदम, रिक्षा व टेम्पो यांचे अध्यक्ष रामू पाटणकर, सरपंच भूषण पोकळे पडेल कॅन्टींग उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, डॉक्टर पोकळे साहेब, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तनावडे साहेब, शाळेचे मुख्याध्यापक, कॉलेजचे शिक्षक व शिक्षिका मुख्याध्यापक, गिर्यातील माजी सरपंच बबन घाटे, पडेल कॅन्टींग चे माजी सरपंच अंकुश टुकरुल, पोलीस पाटील संतोष धुडवळकर, माजी सरपंच मोहम्मद याकूब अली शेख, पोलीस पाटील, माननीय पोलीस शिरगावकर साहेब विजयदुर्ग व पडेल कॅन्टींग चे अनेक मान्यवर सरपंच भूषण पोकळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व या मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला शोभा शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आणि कॉलेज स्टुडंट यांनी केली. या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिक यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला शाल व पुष्पगुच्छ देऊन. पडेल कॅन्टींग च्या शालेय शिक्षक व शिक्षिका यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यानंतर सागर रक्षक दल सदस्य, पाटील, जीव रक्षक सदस्य, कर्तव्यदक्ष नागरिक यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सायबर फ्रॉड कसा होतो या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच पोलीस दलातील दारुगोळा, रायफल प्रशिक्षण व रायफल या संदर्भात माहिती देण्यात आली. ही माहिती विजयदुर्ग पोलीस ठाणे कॉन्स्टेबल जयेश सुरेश कदम यांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक अशी दिली. त्यानंतर विजयदुर्ग सरपंच याच काझी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. आणि हॉल चे मालक प्रभाकर वाडेकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.हा सत्कार विजयदुर्ग पोलीस निरीक्षक दशरथ चव्हाण यांच्यातर्फे करण्यात आला. त्यानंतर पडेल कॅन्टींग सरपंच, उपसरपंच यांची मार्गदर्शन प्रेक्षक वर्गाला झाले. चहापाण्याचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला होता. पोलीस दल हे 1960 मध्ये स्थापन झाले याची सुद्धा माहिती देण्यात आली व नंतर हा कार्यक्रम माननीय शिरगावकर साहेब यांच्या हस्ते पूर्ण करण्यात आला





Social Plugin