Ticker

6/recent/ticker-posts

तरुणांनी राष्ट्रनिर्मितीसाठी विशेष श्रमसंस्कार शिबिरात सहभागी होणे गरजेचे आहे :- ॲड रोहन मोरे



ज्ञानदिप पाटील @प्रतिनिधी ता.पारोळा 

  पारोळा:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग संलग्नित राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा. राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर शिक्षण शास्त्र महाविद्यालय टेहू येथे माजी सैनिक श्री. विठ्ठल भास्कर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक ॲड. रोहन वसंतराव मोरे, टेहू गावाच्या सरपंच सौ.लीना मनोज मोरे,सौ.प्रतिभा सोपान पाटीलश्री.चेतन शिवाजीराव पाटील ग्राम विस्तार अधिकारी, तसेच टेहू गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.

   या उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे संचालक रोहन मोरे यांनी तरुणांनी या श्रमसंस्कार शिबिरातून संस्काराची शिदोरी घेऊन जाऊन भावी आयुष्यात त्याचा उपयोग आपल्या जीवनात केला तर निश्चितच आपला देश एक अधिक प्रभावशाली राष्ट्र बनेल आणि  राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हे होऊ शकते म्हणून तरुणांनी उत्साहाने या शिबिरात सक्रिय सहभागी व्हावे अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केले.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही आर पाटील आय टीआय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन ए पाटील डिप्लोमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी जी पाटील किमान कौशल्य,शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय गणेश मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस पाटील,श्री सचिन मोरे,उपप्राचार्य डॉ. संजय भावसार,विभागीय समन्वयक डॉ.प्रदीप जगन्नाथ औजेकर उपस्थित होते.शिबिरामध्ये पुढील उपक्रम  होणार आहेत रोज सकाळी योगा,सहज योग आहे.विद्यापीठाने या शिबिरासाठी शाश्वत विकासासाठी युवक: पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर ही थिम ठेवलेली आहे.या अंतर्गत दत्तक गावी सदर उपक्रम राबवले जाणार आहे.यात स्वयंसेवकांना एकात्म मानव दर्शन तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व,युथ फॉर माय भारत,सायबर सिक्युरिटी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जल व्यवस्थापन तरुणांनी नव्या युगाकडे जाताना,टेहू ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिर,दंत चिकित्सा शिबिर, नेत्रदान जनजागृती,याशिवाय मिया वाकी घन वन योजना मार्गदर्शन,ग्रामीण विकास, मी माझा देश व माझा समाज, तसेच सिकलसेल तपासणी,एचआय व्ही टेस्ट तपासणी,ग्राम स्वच्छता,प्लास्टिक मुक्त अभियान,मतदान जनजागृती,मातीचा बंधारा बांधणे याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण व ज्वलंत विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन होणार आहे. शिबिरात एकूण ११५ स्वयंसेवक सक्रिय सहभागी आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हीआर पाटील कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. मनीष रघुनाथ करंजे,डॉ. जितेंद्र पाटील, प्राध्यापिका जितूबाई जोगी श्री.जयराम विठ्ठल पाटील,श्री.अमोल भाऊ पाटील व स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.