किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधि
अंतुर्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात माता रमाई यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री एस ए भोई सर यांनी त्याग मूर्ती माता रमाई (रमाबाई भिमराव आंबेडकर) यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी गावातील नागरिक ,बंधू भगिनी, तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.श्री भोई सरांनी माता रमाई यांचे जीवन कथन करताना सांगितले की ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विश्वरत्न होण्यामागे रमाईचे असीम कष्ट आणि अढळ साथ होते,म्हणूनच त्यांना आदराने माता रमाई म्हटले जाते .
रमाबाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ जवळील वणंद गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे (वलंगकर) आणि आईचे नाव रुक्मिणी होते. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले तेव्हा रमाईंनी अत्यंत गरिबीत दिवस काढले घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी शेण वेचून गोवऱ्या थापल्या आणि त्या विकून संसाराचा गाडा चालवला जेणेकरून बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडू नये. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकात रमाईच्या त्यागाचा गौरव केला आहे. त्यांनी रमाईंना त्यांच्या यशाचे श्रेय देताना त्यांच्या मनाचे मोठेपण आणि कष्टाची तयारी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपल्या पाच मुलांपैकी चार मुले (गंगाधर, रमेश ,इंदू आणि राजरत्न) उपचारा अभावी गमावली या दुःखातही त्या डगमगल्या नाहीत आणि समाजाच्या उद्धारासाठी बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिल्या असे परखड विचार मांडले,अश्या अनेक गोष्टी माता रमाई यांचे जीवनावरील कथन केल्या .





Social Plugin