प्रतिनिधी @समाधान भुतेकर
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव निवासी श्री संत गजनान महाराजाचा प्रगटदिन महाराष्ट्रभर मोट्या उत्साहात व आनंदाने साजरा केला जातो त्याचप्रमाणे स्थानिक संत गजानन महाराज मंदिर ईसरूळ येथेही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीचा प्रगटदिन मोठ्या थाटामटाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमची सुरवात श्रीच्या अभ्यंग स्नानने करून भाविक भक्ताच्या उपस्थित आरती करून सकाळी या सोहळ्यास सुरवात झाली.गावातील व पंचक्रोशीतील भजणी मंडळीच्या उपस्थितीत गाव प्रदीक्षना करण्यात आली
ज्यामध्ये चुमिकल्याणी लेझीमच्या तालावर पाऊली खेळत सार्वना मंत्रमुग्ध केले तर विविध सहभागी दिंडयांनी टाळ मृदूगच्या तालावर गण गण गणात बोते च्या गजराने गाव दुमदुमून निघाले गाव प्रदक्षिणे दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक गावातील महिला मंडळी तसेच इतर पुरुष मंडळी कडून सादर करण्यात आले प्रसंगी संपूर्ण गाव श्री गजानन महाराजांच्या भक्ती रंगात रंगून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यांनतर ह. भ. प. जयश्रीताई देशमुख याच्या अमृतवाणीतुन कीर्तन सेवा झाली. किर्तन सेवेन नंतर भव्य दिव्य स्वरूपाचा महाप्रसादाचा कार्यक्रम गावामध्ये पार पडला सदर कार्यक्रमांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी स्वयं स्फूर्तीने उस्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले





Social Plugin