Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत विकास निधीचा मोठा घोटाळा विझोरा व राहेरी खुर्द खर्च चौकशीच्या फेऱ्यात 18 फेब्रुवारी प्रशासनाची धडक तपासणी.



महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी महेंद्र खरात

 दि 16. 02. 2026.

सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा व राहेरी खुर्द ग्रामपंचायत मध्ये विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा संशय गडद झाला असून पंचायत समिती सिंदखेडराजा यांनी अधिकृत चौकशीचा आदेश काढतात संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी सामान्य फंड दलित वस्ती विकास योजना पाणीपुरवठ्याचे कामे पांदण रस्ते तसेच रोजगार हमी योजनेतील खर्चावर गंभीर तक्रारी दाखल झाल्याने विस्तार अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांच्या संयुक्त पथकाकडून तपासणी होणार आहे 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ठीक साडेअकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व खर्चाचे बिले मोजमाप पुस्तिका व मजुरी आदेश तपासले जाणार असून ग्रामपंचायतला पूर्ण कागदपत्रे सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत तक्रारीनुसार अनेक कामे कागदावरच पूर्ण दाखवून व प्रत्यक्षात न झालेली किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे निदर्शनात आले आहे त्यामुळे शासकीय निधीचा अपहार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त होत आहे सूत्राच्या माहितीनुसार चौकशीत दोस्त सिद्ध झाल्यास सरपंच ग्रामसेवक तसेच संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे विकासाच्या नावावर चाललेला हा कागदी गोंधळ उघडकीस येणार की प्रकरण दडपले जाणार याकडे आता संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे