प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
डोणगाव/4 फेब्रुवारीः येथील इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर शाळेच्या स्काऊट पथकाने स्काऊट- गाईड जिल्हा मेळाव्यात ग्रामीण स्तरातून द्वितीय क्रमांक मिळवला.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे स्काऊटच्या जिल्हा मेळाव्यात प्रथमच देवेश पांडुरंग शिंदे व त्याच्या पथकाने अतिशय अप्रतिम अशा भक्तिमय वातावरणात किर्तन सेवा सादर करीत, परंपरागत लोक कलांचे दिमाखदार प्रदर्शन केले.
दिनांक. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी. दरम्यान बुलढाण्यातील कोलवड येथील राजीव गांधी सैनिक स्कूल. मध्ये पार पडलेल्या जिल्हा मेळाव्यात जिल्ह्यातून 65 शाळांमधील1000 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी तंबू सजावट, गाठी, कचरा व्यवस्थापन, पथसंचलन, प्रात्यक्षिक, शारीरिक कवायत, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीत, संस्कृती संवर्धन, किर्तन, शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब आणि मावळ्यांच्या वेषभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना. शाळेचे मुख्याध्यापक गाढे सर, स्काऊटर निलेश राठोड सर, विलास धुमाळ सर, संदिप पंडितकर सर, लाड मॅडम, पुंड मॅडम यांनी मार्गदर्शन केले.या विद्यार्थ्यांचे बुलढाणा अर्बन को-आँप क्रेडिट सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल झंवर, बुलढाणा अर्बन को-आँप क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर तसेच, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले आहे.





Social Plugin