Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यासाठी मंगेश गमे यांना समाजरत्न पुरस्काराने गौरव.



कळमेश्वर : सामाजिक, ग्रामविकास रुग्णसेवेत व निर्भीड पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांना साप्ताहिक महाराष्ट्र सपूतच्या वतीने समाज रत्न 2026 प्रदान करून गौरविण्यात आले.

‘साप्ताहिक महाराष्ट्र सपूत’ च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित दिनदर्शिका प्रकाशन व मान्यवरांचा सन्मान सोहळा कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, उचलेला कॉलनी, साईमंदिर समोर, वर्धा रोड, नागपूर येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अनिल खडसे (IRS), उपआयुक्त आयकर विभाग, भारत सरकार होते. तर विशेष उपस्थिती श्री कुश मोटवानी (IAS) यांची लाभली.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत मंगेश गमे यांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या सन्माना बद्दल मंगेश गमे यांनी आयोजकांचे आभार मानत, “हा पुरस्कार समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे,” अशी भावना व्यक्त केली.