.jpg)
02/02/ 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा निंबी बाल आनंद मेळावा ची सुरुवात करण्यात आली या मेळाव्याचे शाळा समिती अध्यक्ष सौ रेखा ताई भिवंटे व उपाध्यक्ष सहादेव व सत्कार यांनी रिबीन कापून शुभारंभ केला या वेळी शाळा समितीचे सदस्य व पालक वर्ग उपस्थितीत होते
या मेळावा मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठे उत्सव आणि आनंदाने आपला सहभाग नोंदवला वर्ग 1ली ते 5वि तील विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकलेतून विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ तयार केले आणि विक्रीकरिता या मेळ्यामध्ये सादर केले खरेदी करण्याकरिता गावातील माजी विद्यार्थी व पालक वर्ग व महिला मंडळ मोठ्या संख्येने गावातील उपस्थित होते या मेळाव्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट मुलांना लहानपणापासून व्यवसायिक ज्ञान आनंद मिळावा हाच महत्त्वाचा मुद्दा आहे या आनंद बाल मेळावा दरवर्षीप्रमाणे असाच साजरा केला जात असतो या आनंद बाल मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष राऊत सर आणि पर्वेक्षक देशमुख सर यांनी केले होते




Social Plugin