Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांकडून समाजसेवेचा आदर्श उपक्रम.

 


प्रतिनिधी अनिकेत चांदणे

अखिल भारतीय अपंग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, नागपूर ही दिव्यांग, अनाथ व वंचित घटकांच्या आरोग्य, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नया अंदुरा येथील विद्यार्थ्यांनी समाजसेवेचा आदर्श उपक्रम राबविला आहे.

शाळेतील १३ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी “आपल्याला जे मिळते त्यावरून आपण जीवन जगतो, परंतु आपण जे देतो त्यावरून आपण जीवन घडवतो” या विंस्टन चर्चिल यांच्या विचारांप्रमाणे तसेच संत तुकाराम महाराजांच्या “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या उक्तीप्रमाणे प्रेरणा घेऊन २,१९० रुपये जमा केले. ही रक्कम विद्यार्थ्यांनी ॲक्सिस बँकेच्या खात्यात RTGS द्वारे संस्थेकडे सुपूर्त केली.

लहान वयातच सामाजिक बांधिलकी, सेवाभाव व सहकार्याची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे तसेच देणगीस हातभार लावणाऱ्या दात्यांचे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद तसेच केंद्रप्रमुख दिलीप ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.