शिक्षण
पोराले माह्या गुरूजी
शिक्षण असं देजा
माणूस झाला पाहिजे पोरगा
काळजी जराशी घेजा
विज्ञान असं शिकवा त्याले
अज्ञान गेलं पहिजे
सदेह वैकुंठगमन कथा
त्यानं नाकारायला पाहिजे
इतिहासातून त्यानं
घेतला पाहिजे बोध
शिवरायांच्या मृत्युचा
लावला पाहिजे शोध
सुर्य, चंद्र, तारे
ग्रहणही दाखवा नीट
शनिमंगळ नसतो लागत
बसवा त्याच्या डोक्यात फिट
आकड़े मोड भुमिती
करणं शिकवा पटीत
आयुष्याचं विज्ञानातून
मांडलं पाहिजे गणित
ऑनलाइन राहू द्या
ऑफलाईनच शिकवजा
शाहू फुले आंबेडकरांचं
कर्तृत्व त्याले दाखवजा
नागरिक शास्त्र शिकवताना
नजरेपुढं ठेवजा संविधानाले
धर्माआधी असतो माणूस
समजलं पाहिजे पोराले
श्री रामेश्वर तोंडे (कलाशिक्षक)
जि. प. हायस्कूल, मंगरूळ नवघरे
ता. चिखली. जि. बुलडाणा
.jpg)




Social Plugin