Ticker

6/recent/ticker-posts

नरसिंगपूर जिल्हा परिषद शाळेत योग शिबिरातून विद्यार्थ्यांना आरोग्याचा मंत्र...!!



यशवंत पवार कन्नड 

      कन्नड तालुक्यातील नरसिंगपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योग वर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व, प्राणायाम तसेच ध्यानधारणा यांची माहिती देण्यात आली.

याप्रसंगी योग शिबिराचे उद्घघाटन बहिरगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख अनिता जालनापुरकर  यांच्या हस्ते करण्यात आले. एम. ए. योगशास्त्र छात्र विद्यार्थिनी श्रीमती मनिषा पाटील यांनी या योग शिबिराचे आयोजन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्त्व किती  अनन्यसाधारणआहे  हे पटवून दिले.

 योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन एकाग्र होते .तसेच तणाव दूर होण्यास मदत होते. लहान वयापासून योगाची सवय लागल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे श्रीमती  मनिषा पाटील  यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.शिबिरात ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, सूर्यनमस्कार यासह विविध सोपी योगासने प्रात्यक्षिकांसह शिकविण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाचा आनंद घेतला.

या उपक्रमाचे आयोजनासाठी  शाळेचे मुख्याध्यापक श्री .पी.जे.सूर्यवंशी सर ,व  शाळेतील शिक्षिका श्रीमती भावना बागुल  मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच उपस्थित माता पालकांचे ही सहकार्य लाभले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होत असून योग संस्कृतीचा प्रसार होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

       शिबिरासाठी क .ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभाग प्रमुख प्रा.  राजेश पाटील, प्रा.डॉ.लीना चौधरी, प्रा.डॉ. गीतांजली भंगाळे व प्रा. लिंता चौधरी  यांनी मार्गदर्शन केले. तसेच चाळीसगाव तालुक्यातील टाकळी ,पिलखोड बीटचे केंद्रप्रमुख  दिलीप सावंत सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.