टोकेवाडी (ता. खेड, जि. पुणे)
दिनांक –14 फेब्रुवारी 2026
दिनकर बोरकर|प्रतिनिधी
महाशिवरात्री निमित्त टोकेवाडी येथे पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत परिसरातील तसेच पुणे जिल्ह्यातील नामांकित बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविला असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शर्यतीसाठी विशेष मैदानाची तयारी करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विजेत्या बैलगाड्यांना आकर्षक चषक व रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
महाशिवरात्रीच्या धार्मिक वातावरणात या पारंपरिक क्रीडा स्पर्धेमुळे गावात जत्रेचे स्वरूप आले असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि आयोजकांच्या पुढाकारामुळे टोकेवाडीतील ही बैलगाडा शर्यत यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे.





Social Plugin