सेनगाव @संतोष वाठोरे प्रतिनिधी
सेनगाव पंचायत समिती समोर अंशकालीन निदेशक व क्रीडा शिक्षक यांचे मागील नऊ महिन्यापासून रखडलेले वेतन त्वरित खात्यात वितरित करण्यात यावे यासाठी कला क्रीडाकार्यानुभव संघटना सेनगाव यांच्या कडून आज दिनांक 24/02/26 वार मंगळवार रोजी साखळी उपोषण व निदर्शने करण्यात आले.माननीय गटशिक्षणाधिकारी सेनगाव यांनी उपोषण व आंदोलनकर्ते यांची भेट घेऊन मार्च महिन्याच्या दहा तारखे पर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यात आले. माननीय गटशिक्षणाधिकारी यांच्या निर्णयावर सर्व उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.





Social Plugin