Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षिका कविता भगत यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.



प्रतिनिधी : विजय गायकवाड

रिसोड: येथील रहिवासी असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा जयपुर ता. सेनगाव जि. हिंगोली  येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका कु कविता यशवंत भगत यांनी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून विद्यार्थ्यांना  वह्यांचे  व शैक्षणिक उपयोगी साहित्याचे वाटप केले. ज्या गावाच्या कर्मभूमीत आपण पवित्र अशा शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण भागात अध्यापनाचे कार्य करतो. या जाणिवेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्या तत्त्वाची  जाणीव ठेवून काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी वर्ग पहिलीच्या जवळपास शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप करून मदत केली आहे. हे विद्यार्थ्यांना दिलेले साहित्य खरच त्यांच्या मनात आणि जीवनात स्मृती व प्रेरणा मिळावी या सकारात्मक भावनेतून दिलेली एक मदत आहे. नेहमीच त्या विद्यार्थ्यांना मदत करत असतात हा त्यांच्या स्वभावातील विशेष गुण आहे.  या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री जी एन ठेंगळे यांनी या सामाजिक उत्तरदायित्वाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा शुभेच्छा देऊन कौतुक केले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.