Ticker

6/recent/ticker-posts

श्री व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समिती चॅरिटेबल ट्रस्ट अन्नछत्र मंडळ पारोळा यांची मासिक मिटींग संपन्न.

 


प्रतिनिधी- ज्ञानदिप पाटील पारोळा

श्री बालाजी संस्थान श्री क्षेत्र पारोळा संचलीत श्री व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समिती चॅरिटेबल ट्रस्ट अन्नछत्र मंडळ पारोळा यांची मासिक मिटींग संपन्न झाली त्यामध्ये पारोळा येथील भाजीपाला व्यापारी श्री शिवाजी देवराम महाजन उर्फ हरीओम बाबा हे स्वंयपुर्तीने अनछत्र मंडळास भाजीपाला त्यामध्ये बटाटे, लसूण, कांदे, आद्रक व विविध भाज्या त्यांच्याकडून प्रसादालया मध्ये आणून देतात हरीओम बाबा सारखे दानशूर व्यक्ती या समाजात आहेत व अन्नदान सर्वश्रेष्ठ दान या उक्ती प्रमाणे आपल्या दातृत्वास आम्ही सर्वजण सलाम करतो, या समाजाचे आपण देणे लागतो म्हणून मी माझ्या परीने शक्य तितकी मदत करण्याचा मी प्रयत्न करतो श्री शिवाजी महाजन हे बालाजीचे निस्सिम भक्त आहेत त्यांच्या या उदात्त, दानशूर व्यक्तीचा आपल्या विश्वस्त मंडळाकडून त्यांचा यशोचीत सत्कार व सन्मान व्हावा असे विश्वस्त मंडळाने हरीओम बाबा यांना मिटींग मध्ये विशेष आमंत्रीत करून त्यांचा सत्कार व सन्मान करतांना प्रास्तविक श्री गुणवंतराव पाटील यांनी केले बाबांचा सत्कार व सन्मान महाप्रसाद समितीचे अध्यक्ष श्री नानासो ए टी पाटील साहेब मा खासदार व बालाजी मंदीराचे मुख्य विश्वस्त श्री श्रीकांत सोनवणे महाप्रसाद समितीचे विश्वस्त श्री डॉ अनिल गुजराथी, प्रकाश आबा शिंपी, बंडू नाना वाणी, दिलीप शिरुडकर, दिनेश गुजराथी, ॲड दत्ताजी महाजन, प्रमोद शिरोळे, गुणवंतराव पाटील सर, प्रविण कुमार कोळी , किरण वाणी, बापू कुंभार, अमोल अमृतकार, आदि मान्यवरांनी सत्कार व सन्मान  केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे मॅनेजर सतिष वाघ, व अनिल कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले आभार श्री प्रविणकुमार कोळी यांनी मानलेत