प्रतिनिधी @समाधान भुतेकर
आपला देश एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे अनेक शहर स्मार्ट सिटी म्हणून तथा त्या शहरांना जोडणारे मार्ग समृद्धी महामार्ग म्हणून शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या मेट्रो शहरामध्ये उदयास येत असताना 80 टक्के ग्रामीण भागामध्ये वसलेला हा महाराष्ट्र अजूनही विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यातलेच हे काळोना गाव अजूनही असंख्य मूलभूत सुविधा पासून वंचित आहे मूलभूत सुविधाचा अभाव तर आहेच पण गावाचे नाव सुद्धा नकाशावर नाही ही खूप शोकांतिका आहे अधिकाऱ्यांकडे चकरा मारून काहीच हाती लागत नाही म्हणून काल दिनांक 09/02/2026 ला युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, विशाल थुट्टे इतर सहकारी व काळोना ग्रामस्थ महिला व पुरुष, बेमुदत आमरण उपोषणासाठी बसले होते, उपोषण कर्त्यांच्या मागण्या ह्या खालील प्रमाणे होत्या
(1) काळोना गाव महसूल पटलावर घेणे बाबत
(2)काळोना गावाला येणाऱ्या रोडची दयनीय अवस्था तात्काळ दुरुस्त करणे
(3) काळोना गावची स्मशानभूमीची समस्या मार्गी लावणे
(4) काळोना गाव खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित असल्याकारणाने ते मार्गी लावणे,
या संपूर्ण मागण्यासाठी सर्वजण उपोषणाला बसले होते, उपोषणाची दखल घेत प्रशासनाच्या त्या त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मकता दाखवली
उपोषण स्थळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांचे त्यांचे सासरे यांनी रोडच्या तथा स्मशानभूमीच्या कामासाठी निधी देण्याचे कबूल केले तथा जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांनी सुद्धा गावच्या समस्या मार्गी लावण्यासाठी दूरध्वनीवरून आश्वासन दिले या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला सुद्धा वेळ देणे गरजेचे असल्यामुळे शिवाय सर्व मागण्या मागण्या तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्यामुळे पहिल्याच दिवशी उपोषणाची सांगता लिंबू सरबत देऊन करण्यात आली, तसेच या ठिकाणी चिखली तहसीलचे नाही तहसीलदार गायकवाड साहेब अंडेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शक्करगे साहेब , व त्यांचा संपूर्ण कर्मचारी वर्ग, पाटबंधारे विभागाचे पांडे साहेब जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे चेके साहेब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते, पंचक्रोषीतील पंजाबराव जावळे,विष्णू पाटील घुबे,प्रा उद्धव घुबे सर,सतीश पाटील भुतेकर,उषाताई थुट्टे पाटील, व इतर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उद्धव पाटील थुट्टे,भिकन पाटील भुतेकर,ऋषी भोपळे,प्रशांत जेवाळ उपस्थित होते उपोषणास संतोष पाटील भुतेकर विशाल थुटे गणेश उसर, गजानन उसर,समाधान उसर, मधुकर उसर समाधान गाडेकर सावन सिंग उसर, सिद्धेश्वर उसर विठ्ठल उसर विलास उसर तुकाराम उसर ज्ञानेश्वर उसर सुखदेव गाडेकर शिवाजी गाडेकर रंगनाथ शिंदे भास्कर शिंदे शिवाजी उसर रमेश उसर नारायण सर विजय उसर यासह असंख्य महिला उपोषणास बसल्या होत्या





Social Plugin