पुरी - मराठवाड्यात ७ तारखेला सर्वच ठिकाणी झालेल्या मतदानाचा निकाल दिनांक ९ तारखेला लागला. त्यामध्ये गंगापूर तालुक्यातील जामगाव गटाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.
गंगापूर तालुक्यातील जामगाव गटामध्ये शिवसेना व अपक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत बघायला मिळाली.
आणि या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांनी विजयी लढत दिली.
मागील जिल्हा परिषद सदस्य सौ.स्वाती दिलीप निरफळ आणि अपक्ष उमेदवार सौ.दीपा सचिन मुंदडा यांच्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी जामगाव गटातून एक वेगळीच लढत बघायला मिळाली आणि यामध्ये अपक्ष उमेदवार सौ. दीपा सचिन मुंदडा यांनी बाजी मारली. त्यांना मिळालेली मते एकूण याप्रमाणे...
सौ. स्वाती दिलीप निरफळ यांना एकूण ६८७३ मते मिळाली. तसेच
सौ. दीपा सचिन मुंदडा यांना एकूण १४१९६ मते मिळाली. यामध्ये सौ. दीपा सचिन मुंदडा यांनी ७३२३ मतांनी आघाडी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय बिगुल वाजवला.
तसेच कायगाव गण या पंचायत समिती च्या निकालामध्ये तिघांच्या लढतीमध्ये श्री.बळीराम वसंत खताळ या अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.
त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे..
श्री.बळीराम वसंत खताळ (अपक्ष) ६३९७ मते.
श्री.बाबासाहेब एकनाथ चव्हाण (शिवसेना) ३६९२ मते.
श्री.भाऊसाहेब लक्ष्मण गवळी (अपक्ष) ९८० मते मिळाली.
यामध्ये श्री.बळीराम वसंत खताळ यांचा २७०५ मतांनी दणदणीत विजय झाला.
तसेच जामगाव गणात अपक्ष उमेदवार सौ.मालती लक्ष्मण सांगळे यांचा देखील विजय झाला.
त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे..
सौ.मालती लक्ष्मण सांगळे (अपक्ष) ५८७५ मते.
सौ.प्रमिला विनोद काळे (शिवसेना) ४०१९ मते मिळाली.
यामध्ये सौ.मालती लक्ष्मण सांगळे यांचा १८५६ मतांनी विजय झाला.
या विजयानंतर जामगाव व कायगाव या गटातील सर्वच गावांमध्ये हा विजय ढोल ताशे, गुलाल, व फटाके वाजवून साजरा करण्यात आला.
छ.संभाजीनगर जिल्हा परिषद जामगाव सर्कल विजयी निकाल लागल्यानंतर श्री.सुमित मुंदडा व अनेक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.





Social Plugin