Ticker

6/recent/ticker-posts

पाटणला शिवसेनेचा 'शंभु' राज पॅटर्न फुल्ल.. देसाई गटाचा एकतर्फी विजयी.



पाटणकर गटाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग 

           पाटण (दिनकर वाईकर )

पाटणला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या रणधुमाळीत मंत्री शंभुराज देसाई यांचा पॅटर्न फुल चालला असताना येथे पाटणकर गटाचा सुपडा साफ करत पाटण तालुक्याच्या राजकीय इतिहासात बाल्ले किल्ल्याला सुरुंग लावल्याचे चित्र पहायला मिळाले. ७ जिल्हा परिषद गटा पैकी शिवसेना (शिंदे) मंत्री देसाई गटाकडे- ६ जिल्हा परिषद गट राहिले तर भाजपा पाटणकर गटाकडे - १ म्हावशी जिल्हा परिषद गट कसाबसा काठावर राखता आला. तर पंचायत समिती १४ गणापैकी १३ पं.स. गणावर मंत्री शंभुराज देसाई गटाचा भगवा फडकला तर केवळ एका म्हावशी पं.स. गणावर भाजपा पाटणकर गटाला समाधान मानावे लागले. भाजप प्रवेशानंतर पाटणकर गटाला मंत्री देसाई यांची घोडदौड रोखता आली नाही. याचे विशेष सर्वांना वाटत आहे. या निवडणुकीनंतर शिवसेना (शिंदे) मंत्री शंभुराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळत पाटण तालुक्यात जल्लोष साजरा केला.जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण उमेदवारांना पडलेले मतदान पुढील प्रमाणे -* 

 *४७ गोकुळ तर्फ हेळवाक जि.प. गट-*

१) अशोक पाटील - शिवसेना (शिंदे) - १०५७९ - विजयी 

२) दत्तात्रय (बाळासाहेब) कदम - भाजपा- ९५३३ 

३) संतोष कदम- राष्ट्रीय काँग्रेस - ३४७ 

४) शिवाजी कांबळे - बहुजन स.पा. - १५८ 

५) महेश शेलार - शिवसेना (ठाकरे) - ४९०

६) प्रविण गुरव - (अपक्ष)- ५४ 

७) नोटा - ७३

*९३ गोकुळ तर्फ हेळवाक पं. स. गण -* 

१) मंगल माने - शिवसेना (शिंदे)- ४८९५ -विजयी

२) वैशाली कांबळे - भाजप - ४३३१

३) रेखा चव्हाण - शिवसेना (ठाकरे)- ४१६ 

४) पुनम माने- राष्ट्रीय काँग्रेस - २७४

५) नोटा - २२७

 *९४ येराड गण -* 

१) विद्या शिंदे - शिवसेना (शिंदे) - ५७४२ विजयी 

२) वंदना शिंदे - भाजप - ४९०८ 

३) रिया कांबळे - शिवसेना (ठाकरे) - २५२

४) नोटा - ४९    

*४८ तारळे जि.प. गट -*

१) स्वप्ना पाटील - शिवसेना (शिंदे)- १४३३३ विजयी 

२) डॉ. क्रांती साळुंखे - भाजप - ९७३४

3) नोटा - ३७६

*९५ मुरुड गण -* 

१) सविता पवार - शिवसेना (शिंदे)- ७४५२ विजयी 

२) रेखा घाडगे - भाजप - ४१३९

३) रुपाली निकम - (अपक्ष) - ३१९

४) नोटा - १३३       

*९६ तारळे गण-* 

१) विकास जाधव - शिवसेना (शिंदे) - ६५०७- विजयी

२) अभिजीत जाधव - भाजप - ५५९२ 

३) नोटा - ३०१   

*४९ म्हावशी जि.प. गट -*

१) राजेश पवार -भाजप - ११७६३ - विजयी 

२) भरत साळुंखे - शिवसेना (शिंदे) - ११३८२

३) भरत ढेरे- शिवसेना (ठाकरे) - ५९१

४) अरविंद महाबळ -मनसे - १२० 

५) महेश तोडकर - अपक्ष - ९२

६) नोटा - १३८

*९७ म्हावशी गण -*

 १) शंकर घाडगे - भाजप - ६१६९- विजयी 

२) मंगेश मोळावडे - शिवसेना (शिंदे) - ४५३३

३)  शिवाजी साळुंखे - शिवसेना (ठाकरे) - १६७ 

४) नोटा- ९८

*९८ चाफळ गण -* 

१) राधिका पाटील - शिवसेना (शिंदे) - ७४२७- विजयी 

२) कमल झोरे -भाजप - ५५२३

३) नोटा- १७० 

*५० मल्हारपेठ गट -*

१) विजया कुंभार - शिवसेना (शिंदे) - १६२७५ विजयी 

२) सुजाता कुंभार - भाजप -८९४७ 

३) नोटा- ३३१

*९९ मल्हारपेठ गण -*

१) अर्चना पाटील - शिवसेना (शिंदे) - ८२६८ विजयी 

 २) सुमन चव्हाण - भाजप - ५८३७

३) नोटा- २५५

*१०० नाडे गण-*

१) विजय पवार - शिवसेना (शिंदे) - ७५६३ - विजयी 

२) चंद्रशेखर ढवळे - भाजप - ३३५३

३) विकास कदम - राष्ट्रीय समाज पक्ष - १६७ 

४) नोटा - ११०

५१ मारुल हवेली गट-* 

१) योगिता गिरी- शिवसेना (शिंदे) - १६२०३- विजयी 

२) वैशाली गुरव - भाजप - ७१६४ 

३) नोटा- २८५ 

 *१०१ मारुल हवेली गण -* 

१) प्रियांका देसाई - शिवसेना (शिंदे) - ९३४७- विजयी 

२) पुनम मोरे- भाजप - २७७४

३) विद्या सुर्यवंशी - राष्ट्रीय समाज पक्ष - ११६

४) नोटा- १३७ 

१०२ नाटोशी गण-*

१) प्रशांत पवार - शिवसेना (शिंदे) - ६५८५ - विजयी 

२) रंगराव जाधव - भाजप - ४३९६

३) शांताराम सुर्वे - शिवसेना (ठाकरे) - २१३

४) नोटा- ८४

५२ मंद्रुळ कोळे गट -*

१) मृणाल पाटील - शिवसेना (शिंदे) - १४३०४ - विजयी 

२)  डॉ.प्राची पाटील - भाजप - १३२८५

३) नोटा - २२४

१०३ सणबुर गण -*

१) संपदा जाधव - शिवसेना (शिंदे) - ७०६४- विजयी 

२) आकांक्षा खेडेकर - भाजप - ५३१८ 

३) नोटा - १४०

१०४ मंद्रुळ कोळे गण-* 

१) नितीन काळे - शिवसेना (शिंदे) - ७७०३ - विजयी 

२) नितीन पाटील - भाजप -७२२३ 

३) अमरजित पाटील- राष्ट्रीय काँग्रेस - १९४

४) साहिल भालेकर- शिवसेना (ठाकरे) - ८९

५) विलास सावंत- अपक्ष - २३

६) नोटा - ६०

५३ काळगाव गट -*

१) सुनिता चाळके - शिवसेना (शिंदे) - १३५६० - विजयी 

२) प्राजक्ता पाटील - भाजप - ८६८२ 

३) सिताबाई मोडक - शिवसेना (ठाकरे) - ४२९

४) मेघना माने- अपक्ष - १३२ 

५) नोटा- १३७

१०५ कुंभारगाव गण-*

१) सचिन यादव - शिवसेना (शिंदे) - ६३८० - विजयी 

२) रमेश मोरे - भाजप - ४८०४

३) संजय कळंत्रे - शिवसेना (ठाकरे)- ३९७

४) नोटा- २३८

१०६ काळगाव -* 

१) पंजाबराव देसाई - शिवसेना (शिंदे)- ५८१३ विजयी 

२) अनिल डाकवे- भाजप- ४७११

३) संदिप माने - शिवसेना (ठाकरे) - २४४

४) आदित्य मोरे - राष्ट्रीय काँग्रेस - २४० 

५) नोटा- ११३

चौकट- १)

देसाई गटाकडे जि.प.चे- ६, पं.स.-१३ तर पाटणकर गटाकडे जि.प.-१, पं.स.-१*

         पाटणला जिल्हा परिषद गटात १) गोकुळ तर्फ हेळवाक  २) तारळे ३) मल्हारपेठ ४) मारुल हवेली ५) मंद्रुळ कोळे ६) काळगाव हे गट मंत्री शंभुराज देसाई गटाने काबीज केले. तर म्हावशी या एकमेव गटात पाटणकर गटाला कसेबसे काठावरचे यश मिळाले.

       पंचायत समिती गुणांमध्ये १) गोकुळ तर्फ हेळवाक २) येराड ३) चाफळ ४) तारळे ५) मुरुड ६) मल्हारपेठ ७) नाडे ८) मारूल हवेली ९) नाटोशी १०) मंद्रुळ कोळे ११) सणबुर १२) काळगाव १३) कु़भारगाव हे १३ गण मंत्री शंभुराज देसाई यांचा पॅटर्न फुल चालला तर केवळ म्हावशी हा घरचा गण पाटणकर गटाला राखता आला.

चौकट -२)

पाटणकर गटाला भोगावा लागला कानफुक्यांचा परिणाम.

              पाटणकर गटाला गेल्या १२ वर्षांपासून कानफुक्यांचे सल्ले ऐकण्याचा परिणाम भोगावे लागत आहेत. पाटण विधानसभा मतदार संघात पाटणकर गटाचे अस्तित्व राखायचे असेल तर यापुढे कानफुक्यांना बाजूला सारुन सर्व सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला उतरुन काम करावे लागेल अशा प्रखड प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या उमटत आहेत. 

चौकट - ३)

भाजपच्या ना. नरेंद्र पाटील, ना. भरत पाटील यांना धक्का.*

          मुंद्रळ कोळे गटातून माथाडी कामगार नेते  नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजकारणात नवख्या आणि अवघ्या २२ वर्षाच्या शिवसेनेच्या उमेदवार मृणाल पाटील यांनी डॉ. प्राची पाटील यांना असमान दाखवलं. अटीतटीच्या या लढतीत अवघ्या २२ वर्षाच्या मुलीने नरेंद्र पाटील यांच्या पत्नीचा पराभव केल्याने संपूर्ण राज्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मृणाल पाटील या खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरल्या आहेत. तर काळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे नेते ना. भरत पाटील यांच्या पत्नी  प्राजक्ता पाटील यांना शिवसेना  उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला, हा भरत पाटील यांच्या साठी मोठा धक्का आहे.