शिवसेना( उ. बा ठा.)उपजिल्हाप्रमुख शिवानी वाघ यांना मारहाण! अंगावरचे कपडे फाडले!आत्महत्या करण्याचे व्हाट्सअप स्टेटस!
प्रतिनिधी- देविदास वायाळ
लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात काही दिवसापूर्वी बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून तणाव निर्माण झाला.संजीवनी वाघ म्हणाल्या गावातीलच सरपंच व त्यांच्या समर्थकांनी मारहाण करून पोलिसांसमोर आपले कपडे फाडले.तसे विडिओ देखील व्हायरल झालेले आहेत. गावात सध्या प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे.पोलीस घटनस्थळी पोचले आहेत.संजीवनी वाघ म्हणाल्या सगळं संपलं आता मी आत्महत्या करणार!असे व्हाट्सअप स्टेटसच त्यानी ठेवले आहे.
संजीवनी वाघ म्हणाल्या काही दिवसापूर्वी आज्ञात वक्तींनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. तो पुतळा गावातील सरपंच व समर्थांकडून पुतळा हळविण्याचे हालचाली चालल्या होत्यात्याचा विरोध केला असता सरपंच व समर्थांकडून गावातील महिला व पुरुषांना जमा करून आपल्याला मारहाण केली व अंगावरील कपडे फाडले आहे.पोलिसांच्या डोळ्यादेखत फाडले अंगावरील कपडे चिखला येथील तणावपूर्ण वातावरणाचा सध्या विडिओ सोशिअल मीडिया वर व्हायरल झाला आहे.त्यात संजीवनी वाघ यांच्या अंगावरील कपडे पोलीसांच्या डोळ्यादेखत कपडे फाडल्याचे दिसत आहेत.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचविण्याची मला ही सजा आहे का?असा जाब शिवानी वाघ यांनी सरकारला विचारला असून उद्या मी आत्महत्या करणार असे स्टेटस त्यांनी व्हाट्सअप वर ठेवले आहे.
सदर घटना माहिती पडल्यावरोबर मा. आमदार सिद्धार्थ खरात, माजी मंत्री मा. राजेंद्रजी शिंगणे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी जि.प. सदस्य दिलीप वाघ, मेहकर चे नगराध्यक्ष किशोर गारोळे, जि.उपाध्यक्ष शिवसेना उ. बा.ठा गटाचे आशिषभाऊ रहाटे ही मंडळी संजीवनी वाघ व महिलांना न्याय देण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठाण मांडून बसले होते.दरम्यान संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील ही चिखला गावात येऊन गेले.सध्या चिखला गावात कर्फयु लागलेला असून ५० ते ६० पोलीस पाहरा देत आहेत.
.





Social Plugin