सतीश पांडे (कळमेश्वर प्रतिनिधी)
कळमेश्वर :– दि.२१ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक लोककला मंच (ऑल इंडिया) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय 'उद्घाटन समारंभ व भव्य कलावंत गायन मेळावा' कळमेश्वर येथील संत्रा मंडी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीवजी पोतदार साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्षस्थान स्थानिक आमदार डॉ. आशिषजी देशमुख यांनी भूषविले. या मेळाव्यात जिल्ह्यातील शेकडो कलावंतांनी आपली कला सादर केली.
कार्यक्रमाच्या सोहळ्याला प्रमोदभाऊ बागडे राष्ट्रीय अध्यक्ष, किशोरभाऊ भायरे राष्ट्रीय सरचिटणीस, सौ. मीनाताई धरममाळी राष्ट्रीय सह-सरचिटणीस,श्री प्रविन धरममाळी, सौ.सुनंदाताई थूल राष्ट्रीय महिला अध्यक्ष, श्री सुरेशभाऊ डोंगरे राष्ट्रीय सल्लागार, श्री.विजूभाऊ पाटील राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख तसेच विनोद मुंडवाईक, विशाखा गमे, नचिकेत लंगडे,प्रकाश वरुळकर आणि राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.





Social Plugin