Ticker

6/recent/ticker-posts

कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे जल्लोषात आयोजन..

 



कल्पना, कला आणि आत्मविश्वासाचा संगम.. 

यशवंत पवार कन्नड 

 कन्नड   येथिल कृष्णा इंटरनॅशनल स्कूल येथे दि.१४ फेब्रुवारी शनिवार रोजी नर्सरी ते इयत्ता ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या वर्गांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.विविध वेशात झळकले तारे...

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्ती, पर्यावरण संरक्षण, ऐतिहासिक व्यक्ती, सामाजिक संदेश, विविध संस्कृती व परंपरा,विविध राज्याची वेशभूषा अशा विविध विषयांवर आधारित वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. रंगीबेरंगी पोशाख, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि प्रभावी संवादकौशल्यामुळे कार्यक्रम अत्यंत देखणा व प्रेरणादायी ठरला. वेशभूषेतून व्यक्त झाले संस्कार व संस्कृती.

विद्यार्थ्यांसोबत पालकांनी देखील या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला प्रथम फेरीपासून चौथ्या फेरीपर्यंत विद्यार्थी व पालक सहभागी होते. बालपणीचा आनंद पालकांनी या क्षणी अनुभवला.

शाळेच्या संस्थाचालक सौ. वसुंधरा सचिन पवार तसेच श्री.दिग्विजय सचिन पवार अकॅडमीक हेड राधिका मेनन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सविता जाधव व सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो त्यामुळे असे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो, असे मत संस्थाचालक वसुंधरा सचिन पवार यांनी व्यक्त केले. पालकवर्गानेही या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीचे कौतुक केले.

या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणात उत्साह, सर्जनशीलता व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.