दिनांक: 09 फेब्रुवारी 2026
मंठा | प्रतिनिधी : कैलास कोल्हे
येथील यशस्वी कोचिंग क्लासेस, मंठा येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ अतिशय उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्री. समाधान गडदे सर होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मानसिक आरोग्य समन्वयक, परभणी येथील प्रा. श्री. दीपक काळदाते सर, ह.भ.प. श्री. श्रीहरी महाराज बाहेकर, तसेच श्री. सुभाषराव वायाळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून प्रा. श्री. अमोल ठोकरे सर व प्रा. श्री. सुरेश राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “यश मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे,” असे विचार उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून कोचिंग क्लासेसमधील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन व मिळालेला आधार याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास यशस्वी कोचिंग क्लासेसचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंद, उत्साह आणि भावनिक क्षणांनी भरलेला हा निरोप समारंभ उपस्थितांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला.






Social Plugin