🌸देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के 🌸
देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती लागले यात असे दिसून आले की या निवडणुकीत तीनही जिल्हा परिषद गटावर भाजप महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. गाव पुरळ येथे धडाधडीचे कार्यकर्ते श्री संजय नामदेव बोंबडी हे ४४६८ या मताने विजयी झालेले आहेत. त्यांचे विरोधक उबाटा पक्षाचे श्री सुनील दत्ताराम तेली हे २७०८ या मताने पराभूत झालेले आहेत. तसेच एकूण मते ७२५८ पैकी भाजपचे उमेदवार श्री संजय बोंबडी हे १७६० मताने विजयी झालेले आहेत. त्याचप्रमाणे पुरळ पंचायत समितीचे सौ संजना सत्यवान आळवे हे भाजपचे महिला उमेदवार २३९५ या मताने विजयी झालेल्या आहेत व त्यांच्या विरोधात असलेले उबाटा पक्षाचे सौ सानवी सुधाकर तिरलोटकर १२३२ आपल्या मताने पराभूत झालेल्या आहेत. भाजपच्या सौ रंजना आळवे ११६३ मतांनी विजयी झालेल्या आहेत. तसेच तीरलोट पंचायत समितीचे श्री रवींद्र राजाराम तीरलोटकर भाजपा उमेदवार १९५८ या मतांनी विजयी झालेले आहेत. व त्यांच्या विरोधात उबाटा पक्षाचे उमेदवार १५३८ मताने पराभूत झालेले आहे. भाजपचे उमेदवार श्री रवींद्र तिरलोटकर ४२० मतांनी विजयी झालेले आहे असे हे निकाल निवडणुकीचे आहेत. भाजपने विजयाची रेलचल चालूच ठेवलेली आहे. असे हे निकाल लागतात कार्यकारी व पदाधिकारी यांनी विजयाचा जल्लोष केला व विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले. तसेच देवगड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बगंडे, व उप पोलीस निरीक्षक दशरथ, संतोष भालेराव यांच्या निगराणीत कडे कोट बंदोबस्त ठेवून निवडणूक मतदान मतमोजणी शांततेने पार पाडली. तेव्हा सर्व पोलीस ठाणे अधिकाऱ्यांचे आभारी आहोत 🌸





Social Plugin