Ticker

6/recent/ticker-posts

हरभरा पिक पाहणीसाठी हवामान अभ्यासक पंजाब डख यांची उपस्थिती .

 


 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस : तालुक्यातील कलगाव शेत शिवारात आज पार्श्वं जेनेटिक्स इंडिया LLP इंदौर यांच्या वतीने दिग्रस ते आर्णी रोड वरील वाई मेंढी फाट्या जवळ प्रगतिशील शेतकरी श्री देवानंद पंडागळे या शेतकऱ्याच्या शेतात हरभरा पीक पाहणी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध हवामान अभ्यासक श्री पंजाब डक साहेब उपस्थित होते. कृषीधन चे किशोर जाजु सर आणि तालुक्यातील कृषी विक्रेते आणि शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी इनोवेज 81 या हरभरा पिकाविषयी माहिती सांगितली. हा हरभरा ऐक्याएंशी दिवसात तयार होतो. चाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसात फुलांच्या अवस्थेत येतो. हे पीक हार्वेस्टिंग ने काढता येते त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते. त्यानंतर त्यांनी हवामान बद्दल सांगितले. यावर्षी पाऊस सरासरी असून पीक चांगले राहतील त्यानंतर त्यांनी असे सांगितले की पावसाचा अंदाज कोणाला नविचारता निसर्गच अंदाज देतो ते ओळखा आणि शेती करा. निंबाच्या झाडाची शेंडा वाळला तर पाऊस कमी प्रमाणात पडतो. असे बरेच उदाहरणे त्यांनी दिली.वीस फेब्रुवारी पासुन ऊन वाढणार असुन आठवड्याच्या शेवट ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. असे प्रतिपादन केले. उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मोलाचा सल्ला दिला प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख हे येणार असल्याने परिसरातील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आले होते कार्यक्रमला कृषी विक्रेते रामदास बनगिनवार, अमोल बनगिनवार, विष्णु भनक, परिक्षीत पंडागळे आदी कृषी विक्रेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते