बुध, दि. २ (प्रकाश राजेघाटगे) -
श्री जानुबाईदेवी हे खटाव तालुक्यातील राजापूरचे ग्रामदैवत असून २५० वर्षापूर्वी आंबोजी राजेघाटगे यांनी राजापूरची रचना केली. तीन एकरात राजवाडा व एक-दीड एकरात जानुबाईदेवीचे काळ्या पाषाणातील सुंदर मंदिर बांधले. उद्या मंगळवार दि . ३फेबुवारी रोजी रात्री यात्रेनिमित्ताने छबिना होणार असून रात्री १२ वाजता पालखी निघणार आहे . यात्रेनिमित्त या देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे.पाषाणातील मुख्य कमान् असून दक्षिणेकडे उपद्वार आहे. मंदिराचा गाभारा व कळस सुबक आहे. मंदिरासमोर आंबोजीराजें यांची समाधी असून ती कलाकृतीं अद्भुत आहे. शेजारी तीस फूट उंचीची दीपमाळ असून नवरात्र व माघ पौर्णिमेला दीप पेटविलें जातात. माघ पौर्णिमेला देवीचीं वार्षिक यात्रा भरते. मंदिराच्यां पश्चिम मुख्यद्वारावर वेस असून पायऱ्यांवर चढून जाऊन गावाचें सुंदर दृश्य पाहता येते. मंदिराच्यां आवारात चारशे वर्षापूर्वीचा अवाढव्य वटवृक्ष आहे. तों पाच किलोमीटर अंतरावरूनसुद्धा दिसतो. देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व आशा-आकांक्षा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस बुध, फलटण या ठिकाणचे गोंधळी येऊन देवीचा जागर करतात. साताऱ्यापासून ३५ किमी आणि पुसेगावपासून उत्तरेला नऊ किमी अंतरावर राजापूर हे टुमदार गाव आहे.
हे मंदिर सुबक असून जानुबाईदेवी हे जागृत देवस्थान मानले जात असल्याने दूरवरून भक्त दर्शनास येतात. देवीचे मूळ स्थान कोकणातील आहे. ज्या जंगलात ती प्रगट झाली व राजांना दृष्टांत दिला, अशी आख्यायिका सांगितली जाते ते स्थान राजापूरच्या उत्तरेला तीन किमी अंतरावर आहे. त्या स्थानाला जानुबाई खिंड नावाने ओळखले जाते. तेथून नागपंचमी व दसऱ्याला देवीला पालखीत घालून आणले जाते आणि गावात वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. पूर्वीच्या काळी राण्यांना देवीच्या दर्शनास जाण्यासाठी राजवाड्यातून मंदिरापर्यंत भुयार बांधले होते. बुध गावातील राजवाड्यामधून राजापूर येथील मंदिरापर्यंत भुयार आहे आणि या भुयाराच्या तोंडाशी जानुबाईदेवीचे पाषाणाचे लहान मंदिर आहे. बुधच्या राजवाड्यात असे पाषाण कोठेही पाहायला मिळत नाहीत. फक्त ते राजापूरमध्येच पाहायला मिळतात. मंदिराच्या पश्चिमेला काळ्या





Social Plugin