महाराष्ट्र ग्रामीण न्यूज प्रतिनिधी – शरद धाडगे.
नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथे आयोजित करण्यात आलेल्या "श्री संत शिरोमणी सावता महाराज" पुण्यतिथी निमित्त पायी ज्योत सोहळ्यास आज रविवार दि. 9 ऑगस्ट २०२६ रोजी श्री क्षेत्र अरण येथून उत्साहपूर्ण वातावरणात पहाटे 5 वा प्रस्थान करण्यात आले. भक्तिमय वातावरणात विठ्ठलाचा नामघोष, संत शिरोमणी सावतामहाराज की जय, जयज्योती जय क्रांती च्या घोषणा देत आणि हरिनामाच्या गजरात या पायी ज्योतीचे प्रस्थान झाले.
या पायी ज्योत सोहळ्यास परिसरातील तरुण मंडळाचा आणि श्री संत शिरोमणी सावता महाराज युवा क्रांती संघटना न.चिंचोली चा मोठा सहभाग लाभला असून युवकांनी नियोजन, व्यवस्था, शिस्त, भक्तांना मदत आणि मिरवणुकीची सजावट यामध्ये उत्स्फूर्तपणे योगदान दिले. तरुणांच्या सहभागामुळे संपूर्ण सोहळ्यास भक्ती आणि उत्साहाची विशेष झळाळी प्राप्त झाली आहे.
हा पायी ज्योत सोहळा श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांच्या मालिकेतील प्रमुख सोहळा मानला जात असून न. चिंचोली (धाडगे वस्ती), सावता नगर येथे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात येणार आहे.
दि.११ऑगस्ट२०२६ रोजीच्या मुख्य कार्यक्रमाची रूपरेषा
श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- पहाटे ५.०० ते ६.०० – श्री संत सावता महाराजांचा अभिषेक व महापूजा
- सकाळी ८.०० वाजता – ध्वजारोहण
- दुपारी १२.०० ते ३.०० – सांप्रदायिक हरिभजन
- दुपारी ३.०० ते ५.०० – सामुदायिक हरिपाठ
सायंकाळी ७.०० ते ९.०० – ह.भ.प. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के (शास्त्री), श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री क्षेत्र नेवासा यांचे हरिकीर्तन
- रात्री कीर्तनानंतर – तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम
कार्यक्रमास ह.भ.प. व इतर मान्यवर संत-महंत उपस्थित राहणार असून सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन, कीर्तन, हरिपाठ आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.





Social Plugin