Ticker

6/recent/ticker-posts

देशव्यापी संपात कवठेमहांकाळ ग्रामपंचायत कर्मचारी एकवटले; गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन.



कवठेमहांकाळ, दि. १२. (प्रतिनिधी)

 केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या संदर्भात आज कर्मचारी संघटनेच्या वतीने कवठेमहांकाळचे गटविकास अधिकारी मा. उल्हास भांगे यांचे प्रतिनिधी शिंदे साहेब यांना जाहीर निवेदनाद्वारे संपाची पूर्वसूचना देण्यात आली

या संपामुळे १२ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा, साफसफाई आणि इतर अत्यावश्यक सेवांवर याचा परिणाम होऊ शकतो. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष माणिक देसाई सह तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाने या संपाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करावा, अशी विनंती संघटनेमार्फत करण्यात आली आहे.