सायगाव - दिनकर बोरकर |प्रतिनिधी
सायगाव (ता. खेड) येथील भिमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त फुलांची आकर्षक व देखणी सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसर विविध रंगांच्या फुलांच्या माळा, सुंदर फुलांची आरास आणि पारंपरिक सजावटीने नटला असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मंदिरात अभिषेक, रुद्रपाठ आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. “ॐ नमः शिवाय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
मंदिर समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन महंत आप्पा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सोमनाथ पारधी श्री बाळासाहेब चासकर श्री तानाजी बोरकर श्री सुभाष चासकर श्री महादेव बोंबले श्री आदिनाथ बोरकर यांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली. या आकर्षक फुलांच्या सजावटीमुळे सायगाव गावात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





Social Plugin