Ticker

6/recent/ticker-posts

खा. संजय देशमुख यांच्या वाहनाला डंपरची धडक सर्वजण सुखरूप

 


राजपाल बनसोड 

 तालुका प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस: खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला ओव्हरलोड टिप्परने धडक दिल्याची घटना बुधवारी (दि. २६ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ६.४५ वाजताच्या सुमारास दिग्रस दारव्हा रोडवरील साखरा परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून खासदारांसह वाहनातील सर्वजण सुखरूप बचावले आहेत. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे साखरा येथे स्वर्गीय माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते दिग्रसकडे परत येत असताना स्व. सुमनताई राठोड यांच्या शेताजवळ रेल्वे कामावर धावणाऱ्या ओव्हरलोड टिप्पर (क्रमांक एमएच 40 बीजी 6403) ने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या वाहनात खासदार देशमुख यांच्यासह रमेश चव्हाण, दीपक वानखेडे, भारत राठोड, योगेश रामावत, सुरक्षा रक्षक अतिश सवळे आणि चालक शेख माजिद उपस्थित होते. अपघातामुळे खासदारांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; मात्र कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलीस ठाण्याचे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित टिप्पर आणि चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.